चंपाकळी | Diwali Faral Recipe In Marathi
चंपाकळी | Diwali Faral Recipe In Marathi
चंपाकळी हा खरं तर अगदी जुना दिवाळीचा फराळ (Diwali Faral Recipes In Marathi) आहे. आपल्याकडे आता बाहेरून मिठाई आणण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला घरच्या घरी जर मिठाई करायची असेल तर तुम्ही हा फराळ नक्की करून पाहा.
साहित्य :
- 1 वाटी मैदा,
- मोहन – 2 चमचे तेल किंवा तूप
- 1 वाटी साखर
- तळण्यासाठी तेल
चंपाकळी बनवण्याची कृती :
- सर्वप्रथम मैदा चालून घ्यावा .
- मैद्यात मोहन घालून थोडे घट्ट भिजवून अर्धा तास ठेवून द्यावे .
- एका भांड्यात पाणी घ्यावे आणि ते भांडे गॅसवर ठेवावे .
- आता त्यात साखर टाकावी .
- साखरेचा एकतारी पाक करून ठेवायचा, पाकात थोडा केशरी रंग घालायचा
- मैद्याच्या पुरी लाटून मधे कापायची
- केलेली पुरी दोन बाजूला धरुन उलट सुलट अलगद पीळ भरायचा नंतर मंद गॅसवर तळून घ्यावे आणि पाकात टाकावे ती चाफा कळी सारखी दिसते म्हणून ती चंपाकळी असे म्हणतात . हि रेसिपी जरूर बनवून बघा .
Comments
Post a Comment