काळा मसाला (सोलापुरी मसाला ) kala Masala (solapuri Masala) 1 kg
काळा मसाला (सोलापुरी मसाला ) १ किलो
साठवणीतला मसालातुम्हांला सर्वप्रथम दोन वेगवेगळया प्रकारच्या मिरच्या घ्यायला लागतील ,त्यापुढील प्रमाणे : -
१. तिखट लाल मिरची . (लवंगी मिरची )
२. बेडगी लाल मिरची .
प्रथम या दोन्ही मिरच्या निवडून चांगल्या स्वच्छ करून घ्याव्यात आणि नंतर ४ ते ५ दिवस चांगल्या उन्हात सुकवाव्यात (वळवाव्यात )
साहित्य : -
- १/२ किलो तिखट लाल मिरची
- २५० ग्रॅम बेडगी मिरची
- १०० ग्रॅम खडा (अक्ख ) मीठ
- १००ग्रॅम कांदा
- ५० ग्रॅम सुकलेले खोबरे
- ५ ग्रॅम बदामफूल
- ५ ग्रॅम सोंगडे
- ५ ग्रॅम मिरे
- ५ ग्रॅम लवंग
- ५ ग्रॅम तिळ (पांढरे )
- ५ ग्रॅम रामपत्री
- ५ ग्रॅम जावित्री
- ५ ग्रॅम मोठी विलायची
- ५ ग्रॅम शहाजिरे
- ५ ग्रॅम हिंग खडा (अक्ख )
- ५ ग्रॅम दगडफूल
- ५ ग्रॅम मेथी दाणे
- ५ ग्रॅम नाकेश्वर
- २५ ग्रॅम मोहरी
- ५ ग्रॅम तेजपान
- २५०ग्रॅम जिरे ( गोड )
- १०० ग्रॅम धने
- ५ ग्रॅम त्रिफळ
- २५० ग्रॅम खायचे तेल ( रोजच्या तुमच्या वापरातील )
- प्रथम मिरच्या वेगवेगळ्या ४ ते ५ दिवस वाळवून घ्याव्यात . नंतर मिरच्याची देठं काढून घ्यावीत .
- मीठ पण मिरच्याप्रमाणे ४ ते ५ दिवस चांगले वाळवावे . जेणेकरून , त्यातील ओलसर पणा जाऊन मीठ कोरडे होईल ( टीप : हे करणे गरजेचे आहे कारण मीठ जर तसेच टाकले तर मिठात ओलसरपणा तसाच राहतो आणि मसाल्यात जातो आणि मसाला लवकर खराब होतो
- नंतर एक कढई घ्यावी ती चांगली गरम करून घ्यावी . नंतर एक -एक करून सर्व गरम मसाला [तीळ ,तेजपान ,धने ,शहाजिरे ,जिरे ,त्रिफळ ,नाकेश्वर ,दगडफूल ,मोहरी ,५ ग्रॅम हिंग खडा ,मोठी विलायची ,जावित्री ,रामपात्री ,लवंग ,मिरे ,बदामफूल ,सोंगडे ,मेथी दाणे )मंद (बारीक ) आचेवर भाजून घ्यावा .
- नंतर मीठ देखील मंद आचेवर भाजून घ्यावेत . नंतर सर्व गरम मसाला गार करावे .
- नंतर कांडाप मध्ये जाऊन मिरच्या , सर्व गरम मसाला , मीठ कांडप मधून दळून आणावा .
- त्यानंतर एका कढईत तेल घ्यावे . तेल चांगले गरम करून घ्यावे , त्यात कांदा कापून मंद आचेवर लालसर तळून घ्यावा .कांदा थंड करून घ्यावा .)
- नंतर तळलेला कांदा मिक्सर मधून किंवा पाटावर वाटून घ्यावे (टीप : कृपया पाणी टाकूं नये , गरज वाटल्यास कांदा तळताना वापरलेलं तेल थोडं टाकून कांद्याचं वाटण करून घ्यावे .)
- नंतर दळून आणलेल्या मिरच्या, गरम मसाला ,मीठ मोठं भांड घेऊन एकत्र करून करून घ्यावे . नंतर त्यात कांदयाचे वाटण घालून चांगले एकजीव करून घ्यावे .
- १ किलो मसाला तयार होतो .
:
१. मसाला आणि साठवण करतांना विशेषकरून काळजी घ्यावी . हात स्वछ धुवून घ्यावे आणि महत्वाचे म्हणजे हात कोरडे करावे . आणि पाणी मसाल्यात जाऊ देऊ नये ,त्यामुळे मसाला लवकर खराब होतो .
२. मसाला साठवतांना नेहमी काचेची बरणी वापरावी . स्टील चे भांड वापरू नये , कारण मसाल्यात हिंग असल्यामुळे स्टील च्या भांड्याला छिद्र पडते .
३. बरणी स्वच्छ धुवून , उन्हात चांगली वाळून घ्यावी आणि त्यात मसाला भरून साठवून ठेवावा .
काचेची बरणी BUY लिंक 👇 :
https://amzn.to/3go8A9N
Comments
Post a Comment