SHAKARPARA RECIPE IN MARATHI .(शंकरपाळे रेसिपी )

  SHAKARPARA RECIPE IN MARATHI 

शंकरपाळे  रेसिपी 


साहित्य : 

  1.  १ किलो मैदा \  गव्हाचं पीठ .
  2. दूध २५० ml 
  3. साखर २५० ग्रॅम 
  4.  तूप २०० ग्रॅम 
  5. तळण्यासाठी तेल 
  6.  मीठ 
  7. वेलची ७-८



पद्धत :

  १. प्रथम  मैदा \गव्हाचे पीठ  गाळून घ्यावे  , नंतर तूप चांगले गरम करून त्याचे मोहन मैदा \गव्हाच्या पिठात घालावे  व  चांगले एकजीव  करावे . 

२.  नंतर त्यात वेलची पावडर , थोडं मीठ टाकून मिश्रण एकत्र  करावे. 

३. दुसऱ्या भांड्यात  दूध कोमट गरम करून त्यात साखर टाकून विरघळून घ्यावी . 

४.  नंतर साखर  आणि दूध एकत्र केलेलं दूध घेऊन पीठ चांगले घट्टसर  मळून घ्यावे आणि २-३ तास तसंच राहू दयावे . 

५. त्यामुळे पीठ चांगले मुरते  आणि शंकरपाळे  चांगले खुसखुशीत होतात. 

६. २ - ३ तासानंतर पीठ पुन्हा थोडं मळून घ्यावे  आणि चपाती किंवा पोळीसारखे  गोल पण जाडसर लाटून घ्यावे . 

७. आणि आपल्याला हव्या त्या आकारात कापून घ्यावे . 

८. त्यानंतर तेल गरम करून  त्यात थोडे -थोडे करून शंकरपाळे टाकून घ्यावे . 

९.   आता लगेच शंकरपाळे हलवू नये , नाहीतर  त्याचे तुकडे होतील .थोडं ५ मिनिटे थांबून हलवावे  गँस ची आंच          मंद ठेवावी . 

१०.  शंकरपाळे लालसर होईपर्यत टाळून घ्यावे . आणि काढून घ्यावे . 

११.  परात किंवा मोठया  भांड्यात  शंकरपाळे काढून घ्यावे . 

१२. शंकरपाळे थंड करून घ्यावे . शंकरपाळे थंड झाल्यावर  कोरडया डब्यात भरून ठेवावे  आणि वरून कागद लावावा  आणि झाकण घट्ट बंद करावे . 

टीप : 
१. तेल खूप गरम करू नये . कडक तेल तापवल्यामुळे शंकरपाळे करपतात  किंवा  जळतात  आणि महत्वाचे कच्चे राहतात .
२. तेलात शंकरपाळे एकदम टाकून न देता थोडे -थोडे टाकून तळावे ,  कारण  एकदम तेलात शंकरपाळे टाकल्यामुळे तेल  गार \ थंड होते आणि शंकरपाळे विरघळून जातात . 

३. शंकरपाळे गरम भरून नये , गरम भरून ठेवल्यास  शंकरपाळे  खराब होतील . 

४. शंकरपाळे कोरड्या डब्यात आणि कोरड्या जागी ठेवावे  आणि नेहमी  शंकरपाळे घेताना हात  कोरडा ठेवावा , जेणेकरून शंकरपाळे ओला हात  किंवा पाणी लागून खराब होणार नाही .











Comments