( SHEWAI KHEER RECEIPE IN MARATHI) शेवयाची खीर
🔺 शेवयाची खीर 🔺
साहित्य :
- १ वाटी साखर (दुधाचे प्रमाण हे वाढवल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे )
- १ -२ चमचे बारीक तुकडे केले ली शेवया
- १ ते २ चमचे साजूक तूप
- ३-४ बदामाचे काप
- २-३ काजूचे तुकडे
- २-४ पिस्ता काप
- पाणी
- दूध (अर्धा लि ){ दुधाचे प्रमाण तुमच्या गरजेप्रमाणे वाढवू किंवा कमी करू शकता }
- प्रथम गॅसवर भांडे ठेवावे,भांडे तापल्यावर त्यात साजूक तूप टाकावे .तूप गरम झाल्यावर त्यात शेवयाचे तुकडे टाकून लालसर रंगावर भाजून घ्यावे , आणि भाजून झाल्यावर त्यात थोडे पाणी टाकून झाकण ठेवून ५ ते १० मिनिटे शिजू द्यावे .
- शेवया शिजल्यानंतर त्यात दुध टाकावे ,दुधाला उकळी आल्यानंतर त्यात साखर घालावी .
- साखर विरघळल्यानंतर त्यात बदामाचे काप ,काजूचे तुकडे ,पिस्ता काप,घालावे.
- आणि ५ ते १० मिनिट होऊ द्यावे .
- खीर तयार आहे . ही खीर २ -४ व्यक्तीसाठी पुरेशी आहे .आपल्याला हवी तशी सर्व्ह करू शकता थंड किंवा गरम .
Comments
Post a Comment