simple spicy or masala rice khichdi khandesh style in marathi
मसाला किंवा तिखट खिचडी
साहित्य :
1. दोन वाटी तांदूळ2. एक वाटी तूरडाळ
3. एक बारीक चिरलेला कांदा
4. एक टोमॅटो बारीक चिरलेला
5. शेंगदाणे
6. बटाटा( मोठा कापलेला)
7. कोथंबीर अर्धा वाटी
8. लाल मिरची पावडर( एक चमचा)
9. घरगुती गरम मसाला( गोडा मसाला)
10. चवीनुसार मीठ
11. तेल( खायचे)
कृती :
1. सर्वप्रथम कुकर घ्यावा, नंतर गॅसवर ठेवून कुकर गरम झाल्यावर त्यात तेल घालावे
2. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून परतून घ्यावा
3. कांदा थोडा लाल सर झाल्यावर त्यात टोमॅटो घालावा
4. नंतर कांदा मऊ झाल्यावर त्यात गरम मसाला, लाल मिरची पावडर, बटाटा, शेंगदाणे घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
5. त्यानंतर त्यात पाणी घालावे आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण उकळू द्यावे.
6. तोपर्यंत तांदूळ, डाळ घेऊन चांगले स्वच्छ धुऊन घ्यावे.
7. नंतर त्या उकळलेल्या मिश्रणात तांदूळ व डाळ घालावी आणि कोथंबीर घालून मिक्स करावे.
8. या मिश्रणाला उकळी येऊ द्यावी.
9. उकळी आल्यानंतर कुकर चे झाकण लावावे.
10. आणि गॅस मोठ्या आचेवर ठेवून एक शिटी होईपर्यंत वाट बघावी.
11. नंतर गॅसची आच मंद( कमी) करून पंधरा मिनिटे शिजू द्यावे.
12. पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करावा.
13. आणि कुकर थंड होऊ द्यावा( टीप : सिटी वर करून हवा काढू नये)
14. थंड झाल्यावर झाकण उघडून खिचडी वाढावी. ( सर्व्ह )
15. खिचडी कढी किंवा लोणचे, पापड याबरोबर द्यावी.
16. खिचडी दोन ते तीन लोकांसाठी पुरेशी आहे.
17. आपल्या गरजेनुसार प्रमाण कमी जास्त करावे.
COOKER BUY CLICK LINK BELOW : 👇
Comments
Post a Comment